बडोद्याच्या अन्योन्य को. ऑप. बँकेने ‘मराठी वाङ्मय परिषद, बडोदे.’ या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवप्रसंगी संस्थेला दिलेल्या निधीच्या व्याजातून प्रतिवर्षी एक व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अगर विविध क्षेत्रांतील विचारवंतांच्या विचारांचा, ज्ञानाचा, व्यासंगाचा, वाङ्मयीन कलाकृतींचा बडोदेकरांना या व्याख्यानमालेअंतर्गत दोन व्याख्याने आयोजित करून लाभ देणेया व्याख्यानमालेचा श्रीगणेशा सन १९९४-१९९५ मध्ये मा. नारायण सुर्वे यांच्या व्याख्यानाने व काव्यसादरीकरणाने झाला.
व्याख्याते | विषय | वर्ष |
---|---|---|
डॉ. य. दि. फडके | महापुरुषांची चरित्रे-आत्मचरित्रे | २३ डिसेंबर २००० |
मा. नारायण देसाई | सेनानी साने गुरुजी (गुजराती) | २४ डिसेंबर २००० |
प्रा. राम शेवाळकर | स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचे साहित्यदर्शन | २६, २७ ऑक्टोबर २००२ |
मा. मधु मंगेश कर्णिक | प्रतिभेचा पाठलाग मी अन् माझे लेखन | २९ मार्च २००४ ३० मार्च २००४ |
डॉ. विलास खोले | कै. विश्राम बेडेकर व त्यांची साहित्यसंपदा | २५, २६ मार्च २००६ |
मा. अरुण साधू | समाजकारण, राजकारण आणि साहित्य | १४, १५ एप्रिल २००७ |
डॉ. दिगंबर पाध्ये | स्वातंत्र्यपूर्व साहित्य आणि समाज स्वातंत्र्योत्तर साहित्य आणि समाज | ५ एप्रिल २००८६ एप्रिल २००८ |
मा. समीर पळणीटकर | दैनंदिन जीवनात इंटरनेटचा उपयोग | २३ ऑगस्ट २००८ |
मा. ह. मो. मराठे | दिवाळी अंकांची शंभर वर्षेमी न लिहिलेल्या कादंबऱ्या | १२ सप्टेंबर २००९१३ सप्टेंबर २००९ |
मा. डॉ. द. भि. कुलकर्णी | ज्ञानेश्वरीतील अध्यात्मयोगज्ञानेश्वरीतील लावण्ययोग | १७ डिसेंबर २०१०१८ डिसेंबर २०१० |
मा. सतीश काळसेकर | वाचन संस्कृती आणि अापली जवाबदारी | २५ डिसेंबर २०११ |
कै. शांताराम सबनीस सत्कार समितीकडून परिषदेला देणगी म्हणून देण्यात आलेल्या निधीच्या व्याजातून प्रतिवर्षी बडोद्यातील अथवा बडोद्याबाहेरील साहित्य, शिक्षण, विज्ञान आणि (ह्युमॅनिटीज) या क्षेत्रांतील तज्ञ, व्यासंगी व्यक्तींची व्याख्याने आयोजित केली जातात.)
साहित्य आणि इतर शास्त्रे यांचा समन्वय साधणे
महनीय वक्ता : डॉ. अनिल काणे विषय : ' गुरुकुल ते संगणक प्रगती की अधोगती ? ' स्थळ : प्रो. माणिकराव आखाडा, दांडिया बाजार, बडोदे.
महनीय वक्ता : मा. ह. मो. मराठे विषय : ‘दिवाळी अंकांची शंभर वर्षे’ ' मी न लिहिलेल्या कादंबऱ्या ' स्थळ : प्रो. माणिकराव आखाडा, दांडिया बाजार, बडोदे.
महनीय वक्ता :मा. सतीश काळसेकर मराठी भाषेची परंपरा व त्याचा पुनर्विचार स्थळ : प्रो. माणिकराव आखाडा, दांडिया बाजार, बडोदे.
मराठी अकादमीकडून परिषदेला देणगी म्हणून दिलेल्या निधीच्या व्याजातून प्रतिवर्षी व्याख्यानमाला, चर्चासत्रे, परिसंवाद आयोजित केले जातात.
स्थळ : उमा सभागृह, प्रो. माणिकराव आखाडा, बडोदे. वक्ते : मा. शोभा बोन्द्रे विषय : ‘ माधुरी दीक्षित ते मधु दंडवते ’
स्थळ : गुजरात क्रीडा मंडळ, प्रदर्शन मैदान, बडोदे. विषय : समर्थ रामदास स्वामी - चरित्र व कार्य
विषय : श्रीमद्भगवद्गीता (अहवाल ९-१०)