श्रीमंत राजमाता शुभांगीनी राजे गायकवाड
बडोद्याच्या राजमाता श्रीमती शुभांगीनी राजे गायकवाड यांनी लखनऊ युनिव्हर्सिटी मधून इतिहास, इंग्रजी साहित्य आणि अर्थशास्त्र या विषयात
पदवी प्राप्त केली आहे. बडोद्याचे महाराजा पुण्यश्लोक श्रीमंत रणजितसिंगजी राजे गायकवाड यांच्याशी विवाहबद्ध होऊन
त्या बडोद्याच्या महाराणी झाल्या . तेव्हपासूनच त्यांचे बडोद्यातील सामाजिक क्षेत्रातले काम सुरु झाले. महिला
सशक्तीकरण, पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन , साहित्य आणि कलेची जोपासना अशा अनेक विषयांशी निगडित
बडोद्यातील संस्थांमधून त्या कार्यरत आहेत.
अध्यक्षा : महिला सहकारी बँक (१९८६-१९९८)
महाराजा फतेसींग म्युझिअम ट्रस्ट
बालभवन सोसायटी ट्रस्ट
स्वर विलास, बडोदे (गुजरातमध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रचार करणारी सर्वात जुनी संस्था)
सह अध्यक्षा : फॅमिली प्लांनिंग अँड सोशिअल वेलफेर कमिटी,
फेडेरेशन ऑफ इंडियन चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (१९९९-२००१)
ट्रस्टी : सर सयाजीराव डायमंड ज्युबिली अँड मेमोरियल ट्रस्ट,
महाराणी चिमणाबाई स्री उद्योगालय ,
राजमाता यांनी बडोद्यातील पर्यावरणविषयक समस्यांकडे आपले लक्ष वळविले. शहराच्या सर्वतोपरी
विकासासाठी पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा ही एक अनिवार्य गरज आहे असे त्यांचे ठाम मत आहे. त्या
ग्लोबल प्रोमोशन कमिटी फॉर क्लीन एन्व्हायरनमेंट (सॉलेलन) च्या अध्यक्षा आहेत.
२०१२ सालापासून त्या महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी च्या सेनेटच्या सदस्या म्हणून कार्यरत आहेत.
एप्रिल २०१५ सालापासून त्या महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी च्या कुलपती म्हणून कार्यरत आहेत.
यामुळे त्यांना शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याबरोबर काम करण्याचा बहुमान मिळाला आहे. प्रौढ आणि मुलांच्या
मूलभूत साक्षरतेसाठी सार्वत्रिक आणि मोफत प्राथमिक शिक्षण उपलब्ध असावे या विचाराच्या त्या पुरस्कर्त्या
आहेत. त्याचबरोबर स्त्री शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. शिक्षण हे तंत्रज्ञान आणि
संशोधन लक्षी असावे यासाठी विद्यापीठात अनेक उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येतात.
त्यांना संगीताची ,साहित्याची तसेच वाचनाची आवड आहे. पारंपरिक चंदेरी साड्या आणि त्याचे विणकाम
याला पुनर्जीवित करण्यात त्यांना विशेष रस आहे.