कार्यक्रम

एप्रिल २००० ते मार्च २०११ मधील इतर कार्यक्रम
स्थानिक कविसंमेलन


सयाजीनगरीतील प्रथितयश कवींच्या कवितांचा आस्वाद सर्वांना घेता यावा तसेच नवोदित कवींना व्यासपीठ मिळवून देऊन त्यांच्या कविता रसिकांपर्यंत पोहचवाव्यात अशा दुहेरी उद्देशाने बडोद्यातील मराठी वाङ्‌मय परिषदेने महाकवी कालिदास जयंतीचे औचित्य साधून ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ रविवार, दिनांक २ जुलै २००० रोजी एक ‘स्थानिक कविसंमेलन’ आयोजित केले होते. या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे अशा प्रकारचे संमेलन या नगरीत तब्बल बारा वर्षांनी (एका तपाने) होण्याचा योग आला. त्यामध्ये सोळा कवी सहभागी झाले होते.‘ आरसपानी राजवर्खी ’


‘मराठी वाङ्‌मय परिषद, बडोदे.’ व ‘श्रीराम खांडेकर प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक १९ नोव्हेंबर २००० रोजी सुप्रसिद्ध अभिनेते व कुशल दिग्दर्शक श्री. विनय आपटे (मुंबई) व शैलजा मुकुंद (पुणे) यांनी कविवर्य कुसुमाग्रजांच्या काव्यावर आधारित ‘आरसपानी राजवर्खी’ हा कार्यक्रम सादर केला.सुवर्णमहोत्सवी व्याख्यानमाला


‘मराठी वाङ्‌मय परिषद, बडोदे.’ व ‘साने गुरुजी स्मारक ट्रस्ट’ च्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध मराठी लेखक, विचारवंत, संशोधक डॉ. य. दि. फडके यांचे ‘महानुभावांची चरित्रे-आत्मचरित्रे’ या विषयावर २३ डिसेंबर २००० रोजी एक अभ्यासपूर्ण व्याख्यान बडोदेकरांना ऐकायला मिळाले. २४ डिसेंबर रोजी त्यांनी ‘सेनानी साने गुरुजी’ हा विषय त्या दिवशी साने गुरुजींची जयंती असल्याने व्याख्यानासाठी मुद्दाम घेऊन त्याद्वारे त्यांना भावांजली वाहिली. गांधी विचारधारेने प्रेरित होऊन विश्वशांतीच्या कार्यात मोलाचे कार्य केलेल्या नारायणभाई देसाई या रचनात्मक कार्याला जीवन समर्पित केलेल्या एका गुर्जर विभूतीने या दिवसाचे अध्यक्षपद भूषविले. अशा प्रकारे मराठी व गुजराती भाषाभगिनींनी हातात हात घालून या द्विभाषी नगरीतील नागरिकांच्या एकदिलीची प्रचितीच आणून दिली.‘रणांगण’


गुजरातमधील भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी साहित्यसेवेबरोबरच मानवतेच्या नात्याने सामाजिक बांधिलकीची जाणीव असणाऱ्या परिषदेने चंद्रलेखा निर्मित, ‘रणांगण’ या पानिपतवरील अंगारनाट्याचे दोन प्रयोग येथील महात्मा गांधी नगरगृहात रविवार, दिनांक १८ मार्च २००९ रोजी सादर केले. यासाठी निर्माते मोहन वाघ यांनी खास सवलत दिली होती त्यामुळेच हे शक्य होऊ शकले.सयाजीनगरीतील साहित्यविचार

ग्रंथ प्रकाशन सोहळा


‘मराठी वाङ्‌मय परिषद, बडोदे’ या संस्थेने इ.स. १९३१ साली तिची स्थापना झाल्यापासून आजतागायत ऐंशी वर्षात एकंदर अठ्ठावन वार्षिक अधिवेशनांचे आयोजन केले होते. या अधिवेशनांचे अध्यक्षपद साहित्यसम्राट न. चिं. केळकर, सुश्री. वा. म. जोशी, स्वा. सावरकर, आचार्य अत्रे, पु. ग. सहस्त्रबुद्धे, सेतुमाधवराव पगडी, डॉ. विजया राजाध्यक्ष, डॉ. दिलीप चित्रे, विश्वास पाटील अशा अनेकानेक धुरंधर साहित्यिकांनी, विचारवंतांनी, संशोधकांनी विभूषित केले आहे. ह्या अठ्ठावन संमेलनाध्यक्षांच्या विचारमंथनातून निघालेले नवनीत अखिल भारतभर पोहचवावे या उद्देशाने ते संकलित करून त्याचे दोन खंड ‘सयाजीनगरीतील साहित्यविचार’ या शीर्षकांतर्गत प्रा. गणेश अग्निहोत्री व डॉ. दत्तात्रय पुंडे यांच्या संपादनाखाली परिषदेने पुण्याच्या स्नेहवर्धन प्रकाशनतर्फे प्रकाशित केले आहेत.


या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा वडोदरानरेश श्रीमंत महाराजा रणजितसिंह गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली दै. लोकसत्ताचे संपादक डॉ. अरुण टिकेकर यांच्या शुभहस्ते गो. ग. आगरकर पुण्यतिथीचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. गं. ना. जोगळेकर व गुर्जर साहित्यिक डॉ. सितांशु यशश्र्चंद्र या अतिथिविशेषांच्या उपस्थितीत रविवार, दिनांक १७ जून २००१ रोजी संध्याकाळी येथील ‘सत्यम्‌ हॉल’मध्ये शाही इतमामाने संपन्न झाला. या सोहळ्यास ५००हून अधिक वाङ्‌मयप्रेमी उपस्थित होते.सत्कार समारंभ


कविवर्य ना. धों. महानोर – ‘साहित्य अकादमी’ पुरस्काराच्या निमित्ताने - ३ ऑगस्ट २००१
श्री. नीळकंठ वाघमारे ‘सेल्युलर इंडिया हार्मोनी अवॉर्ड’ मिळाल्याबद्दल - ४ ऑगस्ट २००१

 • महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या साहित्य संस्थेशी संलग्न होण्याचा बहुमान प्राप्त झाला- जुलै २००१

 • अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ या प्रतिष्ठित साहित्य संस्थेशी संलग्न होण्याचा गौरव प्राप्त झाला - ऑक्टोबर २००१

 • ‘संगीत मानापमान’ नाटकाचा प्रयोग- २९ सप्टेंबर २००२

 • सुवर्णमहोत्सवी व्याख्यानमाला- २६ व २७ ऑक्टोबर २००२ (कै. श्रीराम खांडेकर स्मारक ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने) वक्ते- प्रा. राम शेवाळकर

 • अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा ४२ वा वर्धापन समारंभ (अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने)

 • व्याख्यान- डॉ. अशोक कामत (पुणे) -२९ मार्च २००३

 • महामंडळाच्या सदस्यांचा व पदाधिकाऱ्यांचा सत्कार - २९ मार्च २००३

 • ‘नाटक व रंगभूमी ’ विषयावर चर्चासत्र - ३० मार्च २००३


सुवर्णमहोत्सवी व्याख्यानमाला - २९, ३० मार्च २००४ (अन्योन्य बँकेच्या संयुक्त विद्यमाने) वक्ते - मधु मंगेश कर्णिक

ख्यातनाम ज्येष्ठ गीतकार, संगीतकार मा. यशवंत देव व ज्येष्ठ रंगकर्मी मा. करुणा देव यांचा सत्कार

सोमवार, दिनांक २७ डिसेंबर २००४, संध्याकाळी ६.०० वाजता

रविवाराच्या गोष्टी - १५ जानेवारी २००५. सादरकर्ते - शं. ना. नवरे (मुबंई)५९ व्या अधिवेशनांतर्गत


 • भावतरंग- २५ फेब्रुवारी २००५ सादरकर्ते : राहूल रानडे व सहकारी

 • रसिक आंतरभारतीच्या वतीने चार भाषांतील ग्रंथांचे भव्य प्रदर्शन- २५, २६, २७ फेब्रुवारी २००५

 • सुखसंवाद कलावंतांशी- २६ फेब्रुवारी २००५ सहभाग : डॉ. विश्वास मेहेंदळे, संजय मोने, सुकन्या कुलकर्णी मोने व डॉ. गिरीश ओक

 • परिसंवाद- ‘सामाजिकता व प्रसारमाध्यमे’-२६ फेब्रुवारी २००५ सहभाग : डॉ. विश्वास महेंदळे, विजय कुवळेकर व विविध क्षेत्रांतील स्थानिक मान्यवर शुभांगिनी

 • पाटणकर, प्रणव गोळविलकर, वर्षा मुतालीक, हेमंत भट्टभट्ट, आल्हाद भागवत आणि ए. डी. व्यास

 • विजय कुवळेकर- प्रकट मुलाखत- २६ फेब्रुवारी २००५

 • ’मला भेटलेली माणसं’ (एकपात्री प्रयोग)- २७ फेब्रुवारी २००५

 • संगीतकार यशवंत देव- जाहीर सत्कार- गायन व मुलाखत (जुम्मादादा व्यायाम मंदिराच्या संयुक्त विद्यमाने) १४ ऑक्टोबर २००५ ‘शब्दप्रधान गायकी’ मा. यशवंत

 • देव १५, १६ ऑक्टोबर २००५ (महाराजा सयाजीराव गायकवाड स्मारक ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने)अमृतमहोत्सवी वर्ष

हीरकमहोत्सवी अधिवेशनाअंतर्गत

दिनांक : २५, २६, २७ फेब्रुवारी २००६संगीतरजनी

शनिवार, दिनांक २५ फेब्रुवारी २००६, रात्री ९.३० वाजता


ससादरकर्ते - ज्येष्ठ लोकप्रिय गायिका अनुराधा मराठे, सचिन करंबळेकर आणि सहकारी

निवेदन - राजेश दामलेत्रिभाषी कविसंमेलन-मराठी, गुजराती, हिंदी

रविवार, दिनांक २६ फेब्रुवारी २००६, सकाळी ९.३० वाजताअध्यक्ष - डॉ. अरुणा ढेरे

सहभाग - सौ. जयश्री जोशी, सौ. सुषमा वाकणकर, दीपक भोंडे, सौ. माधुरी माटे, डॉ. रशीद मीर, मकरंद मुसळे, दिनेश डोंगरे (नादान), नीरव व्यास, अझीझ कादरी, खलील धनतेजवी, डॉ. सय्यद अली नदीम आणि अरुण ब्रह्मभट्ट.

सूत्रसंचालन - कवी मकरंद मुसळेप्रकट मुलाखत

मुलाखतकार - राजेश दामले

सहभाग - डॉ. अरुणा ढेरे, राजन भिसे, शुभांगी गोखले, विकास कदम आणि दिलीप प्रभावळकर

रविवार, दिनांक २६ फेब्रुवारी २००६, रात्री ९.३० वाजतामुखवटे आणि चेहरे

दिलीप प्रभावळकरांच्या नाट्य - चित्र कारकीर्दीची दृक्‌ - श्राव्य आत्मकथा

सोमवार, दिनांक २७ फेब्रुवारी २००६, रात्री ९.०० वाजतासहभाग -सुवर्णमहोत्सवी व्याख्यानमाला

शनिवार व रविवार दिनांक २५ व २६मार्च २००६ संध्याकाळी ९.०० वाजता

वक्तेः डॉ. विलास खोले विषयः विश्राम बेडेकर व त्यांची साहित्यसंपदास्व. बाळासाहेब माने पाटील यांची श्रद्धांजली सभा

शुक्रवार, दिनांक ६ ऑक्टोबर २००६, संध्याकाळी ६.०० वाजतामा. उत्तम कांबळे यांचा ‘शेतकऱ्यांची आत्महत्या’ या विषयावरील स्लाइड शो (सदीप व्याख्यान)

सोमवार, दिनांक ६ नोव्हेंबर २००६, संध्याकाळी ६.३० वाजताअमृतमहोत्सवी व्याख्यानमाला

सोमवार, दिनांक २२ जानेवारी २००७, संध्याकाळी ७.०० वाजता

वक्तेः डॉ. अनिल गोडबोले विषयः ' जीवन जगण्याची कला '६१ व्या अधिवेशनाअंतर्गत

दिनांक : १७, १८, १९ फेब्रुवारी २००७.दिलखुलास - सादरकर्ते - श्री. प्रवीण दवणे, मुंबई.

शनिवार, दिनांक १७ फेब्रुवारी २००७, रात्री ९.३० वाजताचर्चा-परिसंवाद

विषय : ' साहित्य-संस्कृतीवर मीडियाचे परिणाम '

सहभागः श्री. संजय बच्छाव, श्री. श्याम कुलकर्णी, श्री. विजय गोडबोले, आणि श्री. ए. डी. व्यास

शनिवार, दिनांक १७ फेब्रुवारी २००७, रात्री ९.३० वाजता

अध्यक्ष: मा. कुमार केतकर, सूत्रसंचालन: डॉ. वनिता ठाकूर

रविवार, दिनांक १८ फेब्रुवारी २००७, सकाळी १० वाजतामुलखावेगळी माणसं: सुधीर गाडगीळ

१८ फेब्रुवारी २००७, संध्याकाळी ६.३० वाजतारंगारंग गजरा

एक अनौपचारिक मैफील

सहभाग : ‘अवंतिका’-‘ऊनपाऊस’ फेम स्मिता तळवलकर

सुरसिंगार लता अवॉर्डविजेते त्यागराज खाडिलकर,

कवी - वात्रटिकाकार - अशोक नायगांवकर,

बाजपेयी ते बाबामहाराज ह्या साऱ्यांच्या नकला सादर करणारे दीपक देशपांडे

मुलाखतकार : सुधीर गाडगीळ

रविवार, दिनांक १८ फेब्रुवारी २००७, रात्री ९.१५ वाजताप्रशांत दामले, मुंबई ह्यांची थेट-भेट हा त्यांच्याशी गप्पा गाणी व दृष्यफितींचा कार्यक्रम

संवादक : सुधीर गाडगीळ

सोमवार, दिनांक १९, फेब्रुवारी २००७, रात्री ९.३० वाजतासुवर्णमहोत्सवी व्याख्यानमाला

वक्तेः मा. अरुण साधू विषय : ' समाजकारण, राजकारण आणि साहित्य '

शनिवार-रविवार, दिनांक १४ व १५ एप्रिल २००७, संध्याकाळी ६.०० वाजतादिवाळी पहाट

गाण्याचा कार्यक्रमः हौशी कला मंडळ, बडोदे.

८ नोव्हेंबर २००७, पहाटे ५.०० वाजता६२ व्या अधिवेशनाअंतर्गत - २७, २८, २९ डिसेंबर २००७

कविता पानोपानी (पुण्याच्या रसिक आंतरभारतीच्या संयुक्त विद्यमाने)

देश-विदेशात गाजलेला काव्यसादरीकरणाचा अनोखा प्रयोग - सादरकर्तेः सुधीर मोघे

शुक्रवार, दिनांक २८ डिसेंबर २००७, रात्री ९.३० वाजतानिवडक स्वगते

(‘नटसम्राट’, ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ आणि ‘गाढवाचं लग्न’ इ. नाटकांतील)

सादरकर्ते- देवाशिष पांडुरंग पैठणकर

शनिवार, दिनांक २९ डिसेंबर २००७, रात्री ७.३० वाजतागप्पा-कट्टा

सहभागः आयडिया सारेगमप मधील सुनील बर्वे, सीमा देशमुख, मधुराणी गोखले, शैलेश दातार आणि पुष्कर श्रोत्री

शनिवार, दिनांक २९ डिसेंबर २००७, रात्री ९.३० वाजतापरिसंवाद

विषय : ' स्वातंत्र्याची ६० वर्षे : एक ताळेबंद '

अध्यक्ष : मा. सुरेश खरे

सहभाग : मा. सुनील करकरे, डॉ. रविकांत जोशी, मा. अरुण मुजुमदार, सौ. नीता पेंडसे, मा. राजीव कुरुळकर आणि डॉ. प्रताप पंड्या

सूत्रसंचालन : डॉ. वनिता ठाकूर

शनिवार, दिनांक २९ डिसेंबर २००७, रात्री ९.३० वाजता

रविवार, दिनांक ३० डिसेंबर २००७, सकाळी १०.०० वाजताती

सादरकर्त्या : वंदना गुप्ते आणि राणी वर्मा (अजरामर, भावमधुर गीतांची एक श्रवणीय, खुसखुशीत, रंजक नाट्यरुपी गुंफण !)

रविवार, दिनांक ३० डिसेंबर २००७, रात्री ९.३० वाजता


विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर व्याख्यानमाला

विषयः ' समर्थ रामदास स्वामी - चरित्र व कार्य '

२३ जानेवारी २००८ ते २८ जानेवारी २००८, संध्याकाळी ७ ते ८.३०

स्थळः गुजरात क्रीडा मंडळ, प्रदर्शन मैदान, बडोदे.६३ व्या आधिवेशनाअंतर्गत - २३, २४, २५ जानेवारी २००९


गंध प्रीतीचा

प्रेमभावनेच्या असंख्य छटा अभिव्यक्त करणाऱ्या शतकभरातील मराठी सदासतेज प्रेमकवितांचे रसीले अभिवाचन आणि गायन

सादरकर्ते : डॉ. अरुणा ढेरे, डॉ. वीणा देव, अनुराधा मराठे आणि डॉ. गिरीश ओक

स्थळ : महात्मा गांधी नगरगृह, बडोदे.

शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी २००९, रात्री ९.०० वाजताआरसा

देश - विदेशातील रसिकांनी एकमुखाने नावाजलेल्या कथा, कविता, आठवणी, गाणी यांची आरस्पानी प्रतिबिंबे खेळविणारा, खुसखुशीत एकपात्री कार्यक्रम

सादरकर्त्या : सुप्रसिद्ध निवेदिका मंगला खाडिलकर

स्थळ : महात्मा गांधी नगरगृह, बडोदे.

शनिवार, दिनांक २४ जानेवारी २००९, रात्री ९.०० वाजतापरिसंवाद

‘मराठी वाङ्‌मय परिषद, बडोदे’. आणि ‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने

परिसंवादाचा विषय : ‘वृद्धाश्रम काळाची गरज आहे का ?’

रविवार, दिनांक २५ जानेवारी २००९, सकाळी १० वाजता

सूचसंचालन : डॉ. वनिता ठाकूर

स्थळ : उमा सभागृह, प्रो. माणिकरावांचा आखाडा, दांडिया बाजार, बडोदे.

रविवार, दिनांक २५ जानेवारी २००९, सकाळी १० वाजतानथुराम ते देवराम (लाख मोलाच्या गप्पा)

दूरदर्शन, चित्रपट आणि नाट्य अशा तीनही क्षेत्रांत आपल्या अष्टपैलू अभिनयाने आगळावेगळा ठसा उमटविणारे शरद पोंक्षे यांच्या रोमांचक, थरारक, भावपूर्ण अशा अनुभवांनी भरलेल्या गप्पांची पर्वणी.

एकट्यानेच सादर करण्याचा पण तरीही ‘एकपात्री’त न मोडणारा कार्यक्रम

सादरकर्ते : शरद पोंक्षे

स्थळ : महात्मा गांधी नगरगृह, बडोदे.

रविवार, दिनांक २५ जानेवारी २००९, रात्री ९.०० वाजताशनिवार-रविवार, दिनांक १२, १३ सप्टेंबर २००९ संध्याकाळी ७ वाजता

स्थळ : उमा सभागृह, प्रो. माणिकराव आखाडा, बडोदे.

वक्तेः मा. ह. मो. मराठे

विषयः' मी न लिहिलेल्या कादंबऱ्या '

 • ' दिवाळी अंकांची शंभर वर्षे 'सुवर्णमहोत्सवी व्याख्यानमाला

शनिवार-रविवार, दिनांक ३१ ऑक्टोबर, १ नोव्हेंबर २००९

स्थळ : उमा सभागृह, प्रो. माणिकराव आखाडा, बडोदे वेळ : सायंकाळी ७ वाजता

वक्तेः प्रा. डॉ. सिसिलिया कार्व्हालो

विषयःअवघे विश्वचि माझे घर’ : संत ज्ञानेश्वर ते आजपर्यंतचे कवी

 • साहित्यातील स्त्री समाजदर्शन : परिवर्तनाचा प्रवास
परिषदेच्या संकेतस्थळाचा शुभारंभ (वेबसाइटचे लॉन्चिंग)

शनिवार, दिनांक १ मे २०१०, वेळ : सायंकाळी ७.०० वाजता

स्थळ : महाराणी चिमणाबाई विद्यालय, सलाटवाडा, बडोदे.

उद्‌घाटक : मा. बाळकृष्ण शुक्ल (वडोदरानगरीचे महापौर व खासदार)

अतिथिविशेष : मा. प्रा. उषा तांबे (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ), मा. डॉ. राजेन्द्र पटेल (कार्याध्यक्ष, गुजरात साहित्य परिषद)मराठी अकादमी अमृत महोत्सवी व्याख्यानमाला

शनिवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०१०, वेळ : सायंकाळी ७.०० वाजता

स्थळ : उमा सभागृह, प्रो. माणिकराव आखाडा, बडोदे.

वक्ते : मा. शोभा बोन्द्रे

विषय : ‘ माधुरी दीक्षित ते मधु दंडवते ’सुवर्णमहोत्सवी व्याख्यानमाला

शुक्रवार-शनिवार, दिनांक १७, १८ डिसेंबर २०१०, वेळ सायंकाळी ७.०० वाजता

स्थळ : उमा सभागृह, प्रो. माणिकराव आखाडा, बडोदे.

वक्ते : मा. डॉ. द. भि. कुलकर्णी (साहित्यवाचस्पती)

विषय : ‘ ज्ञानेश्वरीतील अध्यात्मयोग ’, ‘ ज्ञानेश्वरीतील लावण्ययोग ’
६४व्या अधिवेशनाअंतर्गत

मिस्किली आणि कविता

शनिवार, दिनांक ५ फेब्रुवारी २०११, वेळ : रात्री ८.०० वाजता

सादरकर्ते - हास्यकवी अशोक नायगांवकरप्रकट मुलाखत

रविवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०११, वेळ : सकाळी ९.३० वाजता

मा. डॉ. नरेन्द्र जाधव

सहभाग : डॉ. रविकांत जोशी, डॉ. वनिता ठाकूर आणि अनिल काणेपरिसंवाद

रविवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०११, वेळ : सायंकाळी ५.०० वाजता

विषय : मराठीतील आत्मचरित्रे / आत्मकथने

अध्यक्ष : डॉ. नरेन्द्र जाधव

सहभाग : संजय बच्छाव, अरुणा जोशी, माधवी मोगरकर आणि डॉ. कांतिभाई मालसतरकाव्यकुमुदिनी

रविवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०११, वेळ : रात्री ९.०० वाजता

मराठी वाङ्‌मय परिषद, बडोदे आणि रसिक आंतरभारतीच्या संयुक्त विद्यमाने

विषय : मराठी भाषेतील गाजलेल्या निवडक कवितांचे गीतात झालेले आविष्करण, सांगीतिक सादरीकरण आणि रसग्रहण यांचा मेळ असलेला एक सुरेल - भावपूर्ण कार्यक्रम बडोदे संगीत कला केन्द्राचे यशस्वी गायक व वाद्यवृंद

वक्ते : कविवर्य अरुण म्हात्रे, मकरंद मुसळे आणि किशोर पाठकगडकरी ते मतकरी

सोमवार, ७ फब्रुवारी २०११, वेळ : रात्री ८.३० वाजता

सादरकर्ते - प्रा. अजित केळकर

मार्गदर्शन - विजय केंकरे, निवेदिका - मालविका मराठे


बहुभाषी ग्रंथ प्रदर्शन

५,६,७ फेब्रुवारी २०११

स्थळ – प्रो. माणिकराव आखाडा, दांडिया बाजार, बडोदे.

मराठी वाङ्‌मय परिषद, बडोदे आणि ज्योती स्टोअर्स, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी, हिन्दी व इंग्रजी पुस्तकांचे भव्य ग्रंथ प्रदर्शन व सवलतीत विक्री

मराठी साहित्यातील दर्जेदार पुस्तकांचे भव्य ग्रंथ दालनज्योति स्टोअर्स, नाशिक यंाच्या सैाजन्याने